सहाय्यक पोलीस निरीक्षकाने गुन्हा दाखल न केल्याने पाच लाख किंवा कारची मागणी ; एलसीबीची २ जणांविरुद्ध कारवाई



धाराशिव  |

५ लाखांच्या लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ९० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी धाराशिव लाचलुचपत विभागाने २ जणाविरुद्ध कारवाई केली आहे. परंडा पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक भगवान भरत नाईकवाडे व पोलिस शिपाई सागर वसंतराव कांबळे या दोघाविरुद्ध कारवाई केली आहे. गेल्या वीस दिवसात परंडा तालुक्यातील हा तिसरा ट्रॅप आहे त्यामधील लाखात लाखोंची लाज घेताना अधिकारी व लोकसेवक रंगेहाथ पकडले जात आहेत.

भगवान भरत नाईकवाडे, सहायक पोलीस निरीक्षक हे दहशतवादी विरोधी पथक, उस्मानाबाद येथे सन २०१९ मध्ये नेमणूकीस असताना त्यांनी वाशी येथे पत्त्याच्या क्लब वर रेड करून त्यामध्ये यातील तक्रारदार व इतरांना आरोपी केले. तसेच त्याच दिवशी त्यांनी सदर जुगाराच्या गुन्ह्यातील व वाशी येथील ईतर लोकांविरुद्ध कलम चा ३५३,३०७ गुन्हा दाखल केला. परंतु कलम ३५३,३०७ च्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांचा सहभाग नसल्याने त्यांना आरोपी केले नव्हते.

१४ एप्रिल रोजी नाईकवाडे व कांबळे यांनी तक्रारदार यांना सन २०१९ मध्ये जुगाराच्या गुन्ह्यात मदत केली आणि कलम ३५३,३०७  मध्ये आरोपी केले नाही म्हणून ५ लाख रुपये किंवा सेकंड हॅन्ड गाडी अश्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ९० हजार लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले परंतु त्यांना संशय आल्याने त्यांनी तक्रादार यांचेकडून लाच रक्कम स्वीकारली नाही. या दोघांविरुद्ध परंडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

 पोलीस पोलीस उप अधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी हा सापळा रचला. सापळा पथकात पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलीस अमलदार दिनकर उगलमोगले, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, विशाल डोके यांनी कामगिरी बजावली.

Post a Comment

0 Comments