बार्शी |
बार्शी शहरातील नामांकित अशा सुयश विद्यालयामध्ये प्रत्येक वर्गासाठी सुवर्ण पदक दिले जाते. सुवर्णपदकासाठी वर्षभराच्या शैक्षणिक गुणवत्तेची परीक्षण करून प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्यांला हे पदक दिले जाते. या परीक्षेमध्ये शाळेची हजेरी, विषय ज्ञान, क्रीडा प्राविण्य, गृहपाठ, तोंडी परीक्षा यासह अन्य गुणवत्तेचे घटक लक्षात घेऊन हे सुवर्णपदक दिले जाते.
सुयश विद्यालयातील मूनलाईट या वर्गासाठी सुभाष नगर येथील अवनिश गणेश शिंदे याला २०२२-२३ या वर्षासाठी सुवर्णपदक मिळाले आहे. हे सुवर्णपदक देताना सहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद नलावडे, सुयश विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर मंडलिक , पालक प्रतिनिधी गरड साहेब यांच्यासह गणेश शिंदे व सत्वशिला शिंदे उपस्थित होते. अवनिशला मुख्याध्यापक सागर मंडलिक, वर्ग शिक्षिका पूजा राकेश अरगडे, प्रमीला पवार यांचे मार्गदर्शन लाभले. सुवर्णपदक मिळाल्यामुळे याच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 Comments