औरंगाबाद |
एका स्त्रीचे शिक्षण म्हणजे अवघ्या कुटुंबाचं शिक्षण हे महात्मा फुले यांना समजलं होतं. त्यासाठीच त्यांनी भारतातली पहिली मुलींची शाळा पुण्यात भिडेवाड्यात सुरू केली. थोर समाजसेवक, क्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती जि. प.केंद्रीय प्राथमिक शाळा कन्नड नं.१मराठी/उर्दू व कन्नड नं.२ येथे सयुक्तिक रित्या साजरी करण्यात आली.
११ एप्रिल रोजी भारतीय इतिहासातले थोर महापुरूष महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे धडे पुण्यात गिरवले. समाजाला शिक्षित केल्याशिवाय समाजातून जातीव्यवस्था किंवा भेदाभेद मिटू शकणार नाही हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी चांगलेचं हेरले होते. एका स्त्रीचे शिक्षण म्हणजे अवघ्या कुटुंबाचं शिक्षण हे महात्मा फुले यांना समजलं होतं. त्यासाठीच त्यांनी भारतातली पहिली मुलींची शाळा पुण्यात भिडेवाड्यात सुरू केली. थोर समाजसेवक, क्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मुख्याध्यापक सतीश कोळी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.सतीश कोळी सह शाळेतील जेष्ठ शिक्षिका कल्पना सुर्यवंशी,सबा अन्सारी,अर्चना पाटील, सुवर्णा गायके यांनी विद्यार्थ्यांना फुलेंच्या विचारांवर मार्गदर्शन केले.यावेळी कल्याण राऊतसह पालकवर्गाची उपस्थिती होती
0 Comments