सोलापूर | पत्नीचा मसाज करायला घरी बोलवलं; मनपा आरोग्य निरीक्षकाने केला महिलेचा विनयभंग


सोलापूर |

पत्नीच्या मसाजसाठी महिलेला घरी बोलवून तिच्याशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी मनपा आरोग्य निरीक्षक नागेश धरणे (रा. उमा नगरी, जुनी मिल कंपाऊंड) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे.

पीडिता ही मसाजचे काम करते. तसेच आरोपी नागेश याची पत्नी ही आजारी असल्याने नागेश हा पीडितेला पत्नीच्या मसाजसाठी घरी बोलवत होता. ११ मार्च रोजीही आरोपी नागेश याने पीडितेला मसाजसाठी घरी बोलवले. पीडिता ही आरोपीच्या घरी गेल्यानंतर मात्र आरोपीची पत्नी तेथे नव्हती. यामुळे पीडितेने तुमची पत्नी कुठे आहे असे विचारल्यानंतर आरोपीने पीडितेशी अश्लील कृत्य केले. ही माहिती पीडितेने आपल्या घरी येऊन पतीला सांगितली. त्यानंतर याप्रकरणी पीडितेने याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी नागेश धरणे याच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments