परणिती चोप्रा बांधणार 'या' खासदाराशी लग्नगाठ

मुंबई |

बॉलीवूड आणि राजकारणी यांचे पहिल्यापासुनच एकमेकांबद्दल आकर्षक राहिलेले आहे. नुकताच अभिनेत्री स्वरा भास्कर आणि राजकारणी फवाद आलम यांचा विवाह पार पडला त्यानंतर आणखी एक अभिनेत्री एका खासदारासोबत लग्नगाठ बांधणार आहे. अफेअरच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आता या दोघांच्या नात्याबद्दल आम अदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करत महिती दिली आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.. तुम्हा दोघांचं नातं प्रेम, आनंद व सहवासाने भरलेलं असावं. माझ्या खूप शुभेच्छा, असं द्वीट खासदार संजीव अरोरा यांनी केलं आहे. 

संजीव अरोरा यांनी आपल्या ट्विटमध्ये परिणीती आणि राघव चड्ढा यांचा फोटो शेअर केला आहे. एखाद्या जबाबदार व्यक्तीनं चोप्रा आणि चढ्ढा यांच्या अफेरवर जाहीरपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे. अरोरा यांच्या वीटमुळं चर्चेला उधाण आलं आहे. राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत. यूकेमध्ये शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली होती. तसेच मागील काही दिवसापुर्वी ते एकत्र दिसले होते. नंतर दोघांच्या कुटुंबीयांचीही भेट झाली होती, आता लवकरच साखरपुडा होणार असल्याची चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments