टेंभुर्णीच्या मंडल अधिकारी मनिषा लकडे यांची लोन देतो म्हणून चार लाख रुपयांची फसवणूक



माढा |

टेंभुर्णी येथील मंडल अधिकारी मनीषा लकडे यांना मुद्रा फायनान्स कंपनीकडून लोन उपलब्ध करून देतो म्हणून प्रोसेसिंग फी म्हणून व वेगवेगळ्या माध्यमातून फोन पे  ॲप च्या द्वारे वेळोवेळी ऑनलाईन पैसे घेऊन चार लाख आकरा हजार सहाशे रुपये ची फसवणूक केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून सविस्तर मिळालेली माहिती अशी की टेंभुर्णीच्या मंडल अधिकारी मनिषा लकडे यांची  लोन देतो म्हणून चार लाख आकरा हजार सहाशे रुपयांची फसवणूक केली प्रकरणी राहुल शर्मा, निधी शर्मा, पंकज भदूरीया,या तीन जनांनी मुद्रा फायनान्स कंपनीकडून लोन उपलब्ध करून देतो असे सांगून वेळोवेळी प्रोसेसिंग फी फिक्स डिपॉझिट व इतर खर्च या नावा खाली फोन पे,गुगल पे  ॲपच्या माध्यमातून मनिषा लकडे यांच्या मोबाईल वरुन २ लाख ७३ हजार ६०० रूपये त्यांचे वडील तानाजी लकडे यांच्या फोन पे वरुन १ लाख रुपये, तसेच  ॲड. पांडूरंग तोडकर यांच्या फोन पे वरून २० हजार रुपये तसेच त्यांचे सहकारी सतिश नागनाथ हांडे यांच्या फोन पे वरून १८ हजार रुपये असे एकूण ४ लाख ११ हजार ६०० रुपये ची दिशाभूल करून फसवणूक केली आहे.या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार केली असुन गु‌ .र . नंबर१९६ /२०२२ प्रमाणे भा. द .वि. कलम ४२०,३४,प्रमाणे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक  सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी ओमासे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments