परांडा |
पी.एम. किसान योजनेचे लँड सिंडीग येस करुन देतो असे शिरसाव मधील एकाचे कागदपत्रे व अंगठ्याचे ठसे घेऊन त्यांचे एटीएम स्वतःजवळ ठेवून ४ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना घडली आहे.
या घटनेसंबंधी सविस्तर वृत्त असे की, सिरसाव, ता. पंरडा येथील संजय श्रीहरी वायकुळे यांना संदीप माळी अन्य १ यांनी दि.३०.१२.२०२२ रोजी ०४.०० ते दि. २८.०२.२०२३ रोजी २४.०० वा दरम्यान पंरडा करमाळा रोडवर तुमचे पी.एम. किसान योजनेचे लँड सिंडीग येस करुन देतो असे म्हणून संजय यांचे कागदपत्र व अंगठ्याचे ठसे घेतले. व फिनो पेमेंट बॅकेत संजय यांचे नावाचे ऑनलाईन अकांउट काडून अकांउटचे ए. टी. एम. स्वता जवळ ठेवून घेतले तसेच संजय यांच्या पी.एम. किसान योजनेच्या अकांउट मधील ४,०००₹ परस्पर काडून संजय यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या संजय वायकुळे यांनी दि. ११.०३.२०२३ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-
४२०, ३४, सह कलम ६६ (क) माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments