सोलापूर |
सोलापूर महानगरपालिकेतील गलिच्छ वस्ती सुधारणा विभागातील सहाय्यक अभियंता यांना १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
सुनील नेमिनाथ लामकाने वय ५७ (पद सहाय्यक अभियंता गलिच्छ वस्ती सुधारणा तांत्रिक विभाग महापालिका) असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे ठेकेदार असुन त्यांनी महानगरपालीका सोलापूर हद्दीत शेळगी ते स्मशानभुमी येथे केलेल्या डांबरी रस्ता चे मोजमापे पुस्तकावर माहे डिसेंबर मध्ये सही करून दिल्याचा मोबदला म्हणुन ६ हजार रुपये व बारामती बँक ते आकाशगंगा मंदीर येथील डांबरी रस्ताचे मोजमापे पुस्तकावर सही करण्यासाठी ७ हजार रुपये असे एकुण १३ हजार रुपयांची लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम महानगरपालीका सोलापूर इमारतीमध्ये सहाय्यक अभियंता यांचे कक्षामध्ये स्वतः लाच रक्कम स्विकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्या विरूद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७, प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
0 Comments