मुंबई |
निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेनेत बंड करत बाहेर पडले आणि भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केलं.
त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सत्तासंघर्ष आणि पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव यांचा वाद निवडणुक आयोगात गेला होता अनेक दिवस निकालाच्या प्रतिक्षेनंतर आज आयोगाने निकाल दिला आहे. निकाल देताच एकनाथ शिंदे यांनी ट्विटरचा प्रोफाइल फोटो बदलला आहे. सोबतच अनेक आमदार खासदारांनी देखील प्रोफाइल फोटो बदलला आहे. हा निकाल लागल्यापासून शिंदे गटात आनंदाचं वातावरण आहे. तर ठाकरे गटात दुःखाचं वातावरण पाहिला मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे 67 पैकी 40 आमदार आहेत. तर, लोकसभेतील 13 खासदार शिंदे गटासोबत आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत लोकसभेतील 7 खासदार राज्यसभेतील 3 खासदार आणि विधानसभेतील 13 आमदार सोबत आहेत.
0 Comments