पत्रकारिता क्षेत्रातील 'राजा' माणूस!



आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर ज्यांनी आभाळ कवेत घेतलं अशा थोर व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे ज्येष्ठ पत्रकार राजा माने. बार्शी सारख्या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कोल्हापूर येथे एमबीए  पूर्ण केल्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात उडी घेतली. आज ४० वर्षानंतर त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वपरिचित आहे. बोले तैसा चाली, त्याची वंदावी पावली! या उक्तीनुसार त्यांचा काम करण्याचा हातकंडा आहे. त्यांच्या एकष्टीनिमित्त बार्शी शहरांमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यांचा जन्म बार्शी येथील बुरुड गल्ली येथे झाला, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण याच शहरात पूर्ण झाले. बालवयात क्रिकेट, विठी-दांडू खेळ त्यांच्या अत्यंत आवडीचे. आजही त्यांचे बालमित्र त्यांच्या क्रिकेटच्या गोडीबद्दल अत्यंत आत्मियतेने माहिती देतात. जे करायचे ते अत्यंत मन लावून करायचे हा मूलमंत्र त्यांनी जीवनभर जपलाय. लोकांची धुणी,भांडी करून लेकराचे संगोपन करणारी आई व गिरणी कामगार असलेल्या वडिलांच्या पोटी जन्म घेतला. सगळ्या अपत्यांचे उत्तम संगोपन केले. आपल्या कामातून राजा माने यांनी आई वडीलांचे पांग फेडले.

गेली ४० वर्ष वृत्तपत्र क्षेत्रात श्रमिक पत्रकार म्हणून ते कार्यरत आहेत. लोकमत, पुढारी, पुण्यनगरी व स्वराज्य या दैनिकांमध्ये संपादक कार्यकारी, संपादक, राजकीय संपादक आधी पदावर त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार आदेश कृती समितीच्या पुणे व कोल्हापूर विभागाचे ते अध्यक्ष राहीले आहेत. राज्य मराठी पत्रकार संघाचे ते माजी प्रदेशाध्यक्ष आहे. 
तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या समवेत त्यांनी ब्रिटन व सायप्रस या देशाचा दौरा केला. याशिवाय त्यांनी युरोप, अमेरिका, तुर्कस्तान, इंडोनेशिया व दुबई आधी देशांना भेटी दिल्या आहेत.

सोलापूर तरुण भारत मुंबई विभाग मुख्य समूह संपादक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. डिजिटल मिडीया पत्रकार संपादक संघटना ते संस्थापक अध्यक्ष आहेत. डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठी त्यांची नोंदणी, नोंदणीकरण व त्यांना सोयी सुविधा निर्माण कराव्यात त्यांची हक्क व कर्तव्य अबाधित राहावी यासाठी राज्यस्तरीय संघटना काम करते. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे पहिले अधिवेशन महाबळेश्वर येथे झाले त्या अधिवेशनाला महाराष्ट्रभरातून तब्बल दीड हजार पेक्षा जास्त पत्रकारांनी उपस्थिती लावली. याशिवाय त्यांच्याकडे व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद आहे. राजा माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी 'मल्टीस्कोर क्रिएशन' या कंपनीची स्थापना केली असून खामक्या इंडिया नावाने डिजिटल न्यूज पोर्टल हि आहे. राजा माने यांनी अफाट जलसंपर्काच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये विविध स्तरावर लोकप्रियता मिळवली आहे. राजकीय पक्ष असो किंवा वेगवेगळ्या संघटना यामध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.

त्यांनी सात पुस्तकाचे लेखन केले आहे, महाराष्ट्रचे शिल्पकार वसंतदादा, लेक माझी लाडकी, अग्निपंख (अग्रलेख संग्रह), गुरुजन, उगवतीचे रंग, चारुकीर्तीवाणी व ज्यांनी आभाळ कवेत घेतलं या सात पुस्तकाचे लेखक त्यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्याने आभाळकवेत घेतलं या पुस्तकाचे प्रकाशन महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला. या पुस्तकाला प्रचंड लोकप्रियताही मिळाली, महाराष्ट्रातील मानाचा समजला जाणारा कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कारही या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा पाटील व लेक माझी लाडकी ही पुस्तके त्यांची विशेष उल्लेखनीय आहेत.

अभ्यासू दृष्टिकोन, अफाट जनसंपर्क, लहानापासून थोरापर्यंत सर्वांचा आदर करण्याची वृत्ती, कोणतंही काम ठरवलं की ते तडीस नेण्याची सवय, आशा विनयशील माणसाच्या एकष्टीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा...!

Post a Comment

0 Comments