सुयश विद्यालय बार्शी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

बार्शी |

 दिनांक 26 जानेवारी वार गुरुवार रोजी सुयश विद्यालयामध्ये स्वतंत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन जैन मंदिर चे ट्रस्टी पोपटलालजी पुनमिया उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणुन संतोष लोंढे मेजर उपस्थित होते. तसेच  पत्रकार विजय कोरे, सरपंच अक्रूड अण्णा गरड ,संस्थापक शिवदास नलवडे उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत पारंपरिक पध्दतीने ढोल, ताशा, झांज,लेझीम च्या तालावर करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन करुन ध्वज फडकविण्यात आला.विद्याथ्यांनी राष्ट्रगीत गायन करुन ध्वाजाला वंदना दिली. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारे गायन व देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले.मान्यवरांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी विद्याथ्यांना सन्मानीत करण्यात आले.कोरे साहेबांनी मनोगतामध्ये विज्ञान व अध्यात्माची  सांगड घातली.अध्यक्षीय भाषणामध्ये अध्यक्षांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक सागर मंडलिक तसेच सहशिक्षक संदीप मुंडे, संदीप शाहीर, आदर्श भांगे,क्रीडाशिक्षक अतुल जाधव, जयराम आडगळे,चेतन जाधव,शैलेश नेवरे व इतर सहशिक्षक यांनी केले. सूत्रसंचालन सौ वर्षा साखरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments