सोलापूर |
दारूबंदी अधिनियम अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीनासाठी आरोपीला मदत करतो म्हणून तीस हजार रुपयाची लाच मागून तडजोडीअंती वीस हजार रुपये घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
मलंग गुलाब तांबोळी, वय ३३ वर्षे, पद जवान नेमणूक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क - भरारी पथक, महाराष्ट्र राज्य मुंबई, सध्या रा. प्रकाश नालवार यांचे स्वामी विवेकानंद नगर, ओम गर्जना चौक, सैफुल सोलापूर येथे घरी भाडयाने मुळ रा. ब्लॉक नं. ५८, अश्विनी कॉलनी, एसआरपीएफ ग्रुप १० जवळ, विजापूर रोड सोलापूर याला अटक करण्यात आली आहे.
यातील वर नमुद आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे विरुध्द राज्य उत्पादन शुल्क सोलापूर येथे दारुबंदी अधिनियम अन्वये दाखल असलेल्या गुन्हात तक्रारदार यांना जामीनाच्या अनुषंगाने केलेल्या सहकार्याचा मोबदला म्हणुन ३०,००० रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २०,०००/- रुपये स्विकारण्यास संमती दिली.
ही कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर. पोलीस अंमलदार पोना प्रमोद पकाले, पोना अतुल घाडगे, पोकों उमेश पवार पोकों स्वप्नील सत्रके व चालक उडाणशिव सर्व नेम एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
0 Comments