बार्शी |
"बिन सत्संग विवेक होई राम कृपा बिन सहज ना सोई"
बार्शी सोलापूर रोड वर आठ किलोमीटरवर असलेल्या योग् वेदांत सेवा समिती आश्रम मध्ये प्रत्येक पर्व सण व संस्कृतीचे निमित्त साधत वेगवेगळे हिंदू धर्म संस्कृतीचे रक्षणार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. योग वेदांत समिती प्रेरणेने बार्शी उपळाई रोडवर असलेल्या हरिओम स्टॉल मधून आयुर्वेदिक औषधामुळे तर हजारो हृदयरोगी, शुगर बीपी एलर्जीचे पेशंटना कमालीचा अगदी कमी दामात गुण आल्याचे,आपण या पूर्वी मध्यमाद्वारे पाहिले आहे.
तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे आलेल्या निगेटिव्ह थॉट्स, नैराश्य,आधी व्याधी यांच्यावर उपाय म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये असे बरेच संस्कार आहेत जे दुर्लक्षित केले चालले आहेत. ज्यामुळे आध्यात्मिक व भौतिक प्रगती होईल यासाठीच बालसंस्कार व योग व उच्च संस्कार च्या माध्यमातून ही समिती नेहमी चर्चेत असते,यावेळी पण अशाच प्रकारे दिनांक 14 '12 '2012 रोजी योग वेदांत सेवा समिती द्वारा असाच एक सद्गुरु कृपा पात्र साध्वी जोसना बहन यांचे भव्य दिव्य भागवत सत्संगाचे आयोजन केले आहे, सकाळी 11 ते अडीच दुपारी चार ते सात या वेळेत होणाऱ् असल्याचे योग वेदांत सेवा समितीचे अध्यक्ष आसलकर यांनी सांगितले.
0 Comments