"अवघ्या २४ व्या वर्षी तपस्या जंगम लोकनियुक्त सरपंच...!"




मुंबई |

रायगड जिल्ह्यात पाहिले 8 निकाल जाहीर झाले आहेत. महाड तालुक्यात शिवसेना-शिंदे गटाची आघाडी आहे. 8 पैकी 6 ग्राम पंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकलाय. तर, 2 ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडं गेल्या आहेत. याचदरम्यान रायगड मधील दासगाव येथील 24 वर्षीय तपस्या जंगम हिने राजकारणात उडी घेत पहिलाच प्रयत्न तिचा यशस्वी ठरला आहे.

तपस्याने नुकतीच हॉटेल मॅनेमेंटमध्ये पदवी प्राप्त केली आहे. यानंतर तिला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती. राजकारणात नवखी असतानाही साडेपाचशे मतांच्या फरकाने तिने विजय मिळवला. गावच्या विकासाचे व्हिजन समोर ठेवूनच आपण राजकारणात उतरल्याचे तपस्याने सांगितले. तिच्या विजयानंतर ग्रामस्थानी एकच जल्लोष साजरा केला. कमी वयात तपस्याने ग्रामस्थांची मते आणि मने जिंकून सरपंचपदावर बसली. रायगड जिल्ह्यातील दासगावमधून सर्वत्र भागातून तिचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments