होळकरशाहीचा इतिहास व कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा- प्रा.डॉ. संतोष कोळेकर

 
भारतीय स्वांत्र्यलढ्यात इंग्रजासमोर कधीही शस्त्र न ठेवणारा एक महापराक्रमी योद्धा म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांची ओळख आहे. अनेक राजांनी इंग्रजांसमोर तलवार खाली ठेवली परंतू यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. त्यांच्या हयातीत एकही लढाई हरली नाही. त्यामुळे अनेक इतिहासकारांनी त्यांची तुलना फ्रान्सचे सम्राट नेपोलियन बरोबर केली आहे. देशाच्या स्वाभिमानासाठी यशवंतराव होळकर शेवटपर्यंत लढले. त्यांनी तलवारीच्या बळाबरोबर बुध्दी च्या जोरावर कार्य केलेले दिसून येते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आज आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. समाजाने त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष कोळेकर यांनी केले.
         
होळकरशाहीने भारतामध्ये एक आदर्श इतिहास निर्माण केला आहे. त्यांनी शोर्याबरोबर सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्य मोठे केले आहे. रयतेसाठी कार्य, आदर्श न्यायदान, युवकांना रोजगार, महिलांना स्वाभिमानाचे जीवन, आदर्श रस्ते, विहिरी, तलाव, पाणपोई, अन्नछत्र , वृक्षारोपण इ. महान कार्य केले आहे.
       
आज त्यांच्या जयंतीनिमित्त फोटो पूजन करून यशवंत ब्रिगेड मार्फत अभिवादन करण्यात आले. त्यांच्या जयंतीनिमित रक्तदान शिबीर घेण्यात आले,500 झाडांचे वृक्ष लागवड करण्यात आली, गोरगरीब जनतेला कपडे वाटप करण्यात आली व गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच समाज बांधवांना सरकारी योजनांची माहिती देण्यात आली, त्याचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा असे आवाहन यशवंत ब्रिगेड मार्फत करण्यात आले. यावेळी  यशवंत ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. अमोल गावडे, हातकणंगले तालुका अध्यक्ष मा. विलास अनुसे, मा. जगन्नाथ माने, मा. सचिन नांगरे, मा. अवघडी पुजारी, मा. भिमराव कारंडे, मा. दत्तात्रय सिसाल, मा. अमोल माने, मा. सुनील सलगर, अजित कोळेकर, प्रकाश गोरड, सोमनाथ मंडले, सखाराम डफडे, राहुल लांबोरे, अविनाश गायकवाड, सुरेश कोकरे, श्रीकृष्ण बुरुंगले , प्रकाश सिद, रावसाहेब राणगे, बिरदेव रानगे , विजय अनुसे , सीमा झोरे इ. यशवंत ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments