आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची सोशल मीडियावर बदनामी; भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



उस्मानाबाद |

राज्याचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची बदनामी केल्याप्रकरणी 4 जणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम पोलिस ठाण्यात बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. आरोग्यमंत्री डॉ सावंत यांचा उल्लेख खेकडा, हाफकीनसह अन्य जोक वापरून मिम्स करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्या गेल्या व त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे भुम तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

हे गुन्हा उस्मानाबाद सायबर विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 सह इतर कलमाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments