बार्शी |
बार्शी शहरातील वैद वस्ती येथील रस्ते गटारी तसेच नागरी समस्या,वैयक्तिक अडीअडचणी सोडवल्याबद्दल वैदु समाजातील बंधू भगिनींच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार राजाभाऊ राऊत म्हणाले की, बार्शी शहरातील सर्व समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे. तसेच वैदु समाजाच्या सभामंडपाचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल.समाजकारण आणि राजकारण करत असताना केलेल्या कामाची पोचपावती म्हणून ज्यावेळी नागरिकांकडून सत्कार केला जातो त्यावेळी केलेल्या कामाचे चिज झाले असे वाटते.वैद वस्ती मधील रस्ते गटारी तसेच वैयक्तिक अडीअडचणी सोडल्याबद्दल जो सन्मान केला त्याबद्दल आपला सदैव ऋणी राहील,असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला समाजातील सर्व समाज बांधव तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
0 Comments