बार्शी |
दिव्यांग बांधवांच्या बाबतीत आमदार राजाभाऊ राऊत यांनी काही रखडलेल्या प्रश्नांवर एक बैठक घेण्यात आली होती. बैठकीला अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय काका कुलकर्णी, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक महारुद्र परजणे, तहसीलदार सुनिल शेरखाने, चिखर्डे या गावातील कुरूळे कुटूंबिय व अन्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उपोषणाला बसलेले चिखर्डे गावचे कुरूळे परिवार यांच्या सर्व अडचणी जाणून घेण्यात आल्या, आमदार फंडातून शक्य असेल तेवढी मदत त्यांना व सर्व दिव्यांग बांधवांना करण्याचे आश्वासन दिले व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून काही योजना असल्यास त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवू असेही आश्वासन त्यांना देण्यात आले, त्यांना योग्य तो मार्ग व प्रशासनाकडून कोणतीही अडचण याबाबतीत येणार नाही. त्यांनी आपले उपोषण माघारी घेऊन येत्या 12 तारखेला होणारे हलगी नाद आंदोलन देखील रद्द केले.
0 Comments