अक्कलकोट येथे युवकाच्या अंगावर मळणी गेल्याने मृत्यू



अक्कलकोट |

मैंदर्गीत प्रतिविधिस जात असताना रास करणारे हार्वेस्टर मशीनचे ताबा सुटुन तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. दिनांक 16 आज सकाळी साडेआठच्या सुमारास शांतप्पा बिरप्पा पुजारी वय वर्षे अंदाजे( 30)  हा तरुण आपल्या मोटार सायकल वरून प्रातर्विधीसाठी मोनेस्वर मंदीर समोरील फारेस्ट जवळून जात असताना तूर रास हार्वेस्टिंग मशीन चडणला बंद पडले. 

त्यांचे ताबा सुटला मागे शौच्यविधीसाठी जात असलेल्या युवकाच्या अंगावर मळणी यंत्र गेल्याने त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला व दक्षिण पोलीस ठाणे येथे या बाबत गुन्हा नोंद झाला. मयत प्रेत पंचनामा साठी व पिएमसाठी अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास काम चालू आहे. या घटनेमुळे मैंदर्गी गावात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments