मुंबई |
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावरून बदली झाल्यानंतर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या आयपीएस तेजस्वीनी सातपुते यांना मुंबई येथे पोलीस उपायुक्त या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. गृह विभागाने आयपीएस दर्जाच्या १०२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
सोलापूर येथून बदली झालेल्या आयपीएस तेजस्वी सातपुते यांना मुंबई येथे पोलीस उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची ही दुसरी वेळ आहे. तेजस्विनी सातपुते यांच्या समवेत १०२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
0 Comments