माढा पोलिसांच्या तत्परतेने बालविवाह रोखला ; पोलिसांनी नागरिकाला 'हे' केले आवहान


माढा |

माढा तालुक्यातील मानेगाव येथे अल्पवयीन मुलगी मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावुन मुलीची आई व इतर नातेवाईकांकडे यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर मुलीचा विवाह होत असल्याचे सांगितले तेंव्हा तिचे वयाबाबत पोलीसांनी खात्री करून तिचे लग्न करता येणार नाही असे समजावून सांगितले परंतु ते सदर मुलीचे गुपचुप लग्न करतील असे वाटत असल्याने व बालविवाह होण्याची शक्यता असल्याने सदर अल्पवयीन मुलीस व तिची आई व इतर नातेवाईक यांना पोलीस ठाणेस बोलावुन घेवुन बालविवाह रोखुन पुढील कारवाई करिता अध्यक्ष बालकल्याण समिती सोलापूर यांचेकडे पाठविले आहे. 

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी जिल्हयात कोठेही बालविवाह होणार नाही अशा सक्त सुचना दिलेल्या आहेत. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी  जालींदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली माढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनि शाम बुवा यांनी व पोसई महंमद शेख, ग्रे पोसई बोटे, सपोफौ भापकर, पोहेकॉ/१६२३ पोरे, मपोना / १७५५ कस्तुरे, पोकॉ/११३८ घोळवे, पोकॉ/ लक्ष्मण शेळके यांच्या पथकाने केली आहे, माढा पोलीसांनी असे बालविवाह होत असतील तर पोलीस ठाणेस माहिती कळविणेचे जनतेस आव्हान केले आहे.

Post a Comment

0 Comments