दिल्ली |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रेडिओवरील 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित केले. या कार्यक्रमात ‘वैष्णव जन तो...' हे महात्मा गांधींचे आवडते भजनही ऐकवले.
दरम्यान, मन की बातमध्ये बापूंचे भजन कानावर पडताच गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर हे भजन ऐकवले गेले नाही ना अशी चर्चा आज दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.
मन की बात कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मोदींनी जी-20,
हिंदुस्थानचे अंतराळ क्षेत्रातील स्थान, हिंदुस्थानी संगीताच्या वाढत्या लोकप्रियतेसह अनेक मुद्यांवर चर्चा केली. आजचा 95वा मन की बात कार्यक्रम होता.
0 Comments