कृषी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात ; कृषी उत्पन्न बाजार समिती रणवीर राऊत यांनी केली पदाधिकाऱ्यासमवेत पाहणी


बार्शी |
    
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली असून कृषी प्रदर्शनाच्या स्टाॅल उभारणीच्या कामाची बाजार समितीचे सभापती रणवीर राजेंद्र राऊत यांनी पाहणी केली. येणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना कृषी महोत्सवाचा लाभ घेता यावा यासाठी हा कृषी महोत्सव एकूण ५ दिवस चालणार असून जिरायती,बागायती पिकांबरोबरच प्रयोगशील शेतीदेखील डोळ्यासमोर ठेवून प्रदर्शनामध्ये तश्या प्रकारच्या कंपन्या सहभागी आहेत.
      
सभापती रणवीर राजेंद्र राऊत यांनी स्टाॅल उभारणी,पाणी व स्वच्छता व्यवस्था या चालू असलेल्या कामाची पाहणी केली.हा कृषी महोत्सव दि.०९ ते १३ नोव्हेंबर दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर होत असून यावेळी कृषी प्रदर्शनाबरोबरच कृषी औजारांच्या प्रात्यक्षिकांसाठी विशेष क्षेत्र,देशी गायींचे प्रदर्शन,लघुउद्योग क्षेत्रातील उद्योगांचे विशेष दालन व महिला बचत गटांचे विशेष दालन,३०० पेक्षा जास्त स्टाॅल,पिक स्पर्धा व पारीतोषिके,विशेष चर्चासत्रे,डाॅग शो तसेच विविध कृषी उपयोगी साधने यांचा समावेश करण्यात आला आहे.
     
यावेळी संचालक रावसाहेब मनगिरे मालक,माजी नगरसेवक दिपक(आबा)राऊत, माजी नगरसेवक विजय चव्हाण ,माजी  नगरसेवक भैय्या बारंगुळे,माजी नगरसेवक रोहित लाकाळ, उद्योजक दिपक तलवाड,माधवराव देशमुख,किरण कोकाटे, मुकुंद यादव तसेच इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments