बार्शी |
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत राज्यस्तरीय भगवंत कृषी महोत्सवाचे आयोजन बाजार समिती आवारात करण्यात आले आहे.या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते ऑनलाईन करण्यात आले.
यावेळी आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे,जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, बाजार समितीचे सभापती रणवीर राजेंद्र राऊत,प्रांताधिकारी हेमंत निकम,बाळासाहेब चव्हाण,सुनिल शेरखाने,रमेश पाटील,दिलीप गांधी,अनिल डिसले,कुंडलिक गायकवाड,मदन दराडे,सुधिर बारबोले,झूंबर जाधव,रावसाहेब मनगिरे,सचिन मडके यांच्यासह सर्व संचालक,प्रतिष्ठित मान्यवर,सर्व नगरसेवक पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य, सर्व पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचा घटक म्हणून सर्वाधिक शेष भरणारे व्यापारी संतोष लोंढे, राजकुमार गावसाने,ई पेमेंट सर्वाधिक वापरासाठी दिलीप गांधी,शेती उत्पादनासाठी मनोहर सोमाणी,मुनिम गणेश शिंदे,सतिश वाघ,तोलार शिवाजी साळुंखे,धनंजय वाघ यांचा आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.अतिवृष्टी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून 85 कोटीचे अनुदान मिळवून दिल्याबद्दल नवनाथ कसपटे व मान्यवरांच्या हस्ते आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
बार्शी तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरणार असून या कृषी प्रदर्शनात महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील नामांकित कृषी क्षेत्रातील अग्रेसर कंपन्या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.
पाच दिवसीय कृषी प्रदर्शनात १० नोव्हेंबर दुपारी २ वाजता लहरी हवामान याविषयी पंजाबराव डख यांचा परीसंवाद संपन्न झाला तसेच ११ नोव्हेंबर दुपारी २ वाजता फळछाटणीनंतर द्राक्ष वेलीचे व्यवस्थापन या विषयावर डाॅ.आर.जी.सोमकुंवर,१२ नोव्हेंबर दुपारी २ वाजता आदर्श गोठा व्यवस्थापन या विषयावर डॉ.नितीन मार्कंडेय,१२ नोव्हेंबर दुपारी ४ वाजता महीला मेळावा व कृषीरत्न सीताबाई मोहिते,१३ नोव्हेंबर दुपारी २ वाजता एकरी शंभर टन ऊस उत्पादन सहज शक्य या विषयावर कृषिभूषण संजीव माने या सर्व मान्यवरांचे परिसंवाद होणार आहेत.
भगवंत कृषी प्रदर्शन सर्व शेतकरी बांधवांकरिता विनामूल्य राहणार आहे.तसेच कृषी प्रदर्शनात कृषी प्रदर्शनाबरोबरच कृषी औजारांच्या प्रात्यक्षिकांसाठी विशेष क्षेत्र,देशी गायींचे प्रदर्शन,लघुउद्योग क्षेत्रातील उद्योगांचे विशेष दालन व महिला बचत गटांचे विशेष दालन,३०० पेक्षा जास्त स्टाॅल,पिक स्पर्धा व पारीतोषिके,विशेष चर्चासत्रे,डाॅग शो तसेच विविध कृषी उपयोगी साधने यांचा समावेश करण्यात आला आहे.यामध्ये सरकारी योजनांची माहिती देणारे जिल्हा परिषदेचे, कृषी विभागाचे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व कृषी विद्यापीठाचे स्टॉल्स याबरोबरच बी-बियाणे,कीटकनाशक, रोपवाटिका, ट्रॅक्टर,मशागतीचे यंत्र,ठिबक सिंचन,गृहउपयोगी वस्तूचे व महिला बचत गटांचे स्टॉल्स लावलेले आहेत.
बार्शी शहर व तालुक्यातील शेतकरी बांधव,शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी,गृहिणी,महिला बचत गट यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी,असे आवाहन बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राजेंद्र राऊत यांच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments