सोलापूर |
दिवसेंदिवस महिला वरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे सोलापूर शहरांमध्ये लष्कर परिसरात फलटण मज्जीती जो राहणाऱ्या एका विवाहितेचा मृत्यू झाला असून कुटुंबीयांनी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून ते सर्व पसार झाले आहेत. मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक सिव्हीलमध्ये जमा झाले आहेत.जोपर्यंत पती व इतर नातेवाईकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा मुलीच्या आईवडिलांनी दिला आहे.
मुलीचे नाव मिजबा कुरेशी असून तिच्या पतीचे नाव शाहिद कुरेशी असल्याची माहिती मिळाली आहे. सदर मुलीचे अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मुलगी विजापूर येथील असून मुलगा लष्कर भागातील रहिवासी आहे. मुलीच्या नातेवाईकांनी आरोप लावला आहे की, लग्नाच्या वेळेला पाच लाख रुपये दिलेले असताना पुन्हा दहा लाख रुपयांची मागणी सासरकडच्या लोकांकडून सतत होत होती मुलगा देखील सतत मारहाण करत असल्याचे सांगितले. असा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.
0 Comments