सोलापूर |
सोलापूर शहरातील नववीत शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी वसंत कोकरे ( वय १४, रा. भारतमाता नगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे.आईला अभ्यास करते असे सांगून तिने दार लावला होता.बराच वेळ झाला तरी तिने दार उघडले नव्हते.शेवटी आईने तिला हाक दिली,प्रतिसाद मिळत नसल्याने तिने खिडकीतून डोकाऊन पाहिले. वैष्णवीने नायलॉनच्या दोरीने छताच्या फॅनला गळफास घेतला होता.हे दृश्य पाहून आईने हंबरडा फोडला.आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी ताबडतोब याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले,डॉक्टरांनी मृत झाल्याची माहिती दिली.
*अभ्यास करते म्हणून तिने घेतला गळफास-
वैष्णवी कोकरे हिने राहत्या घरात नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने छताच्या फॅनला गळफास घेतला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. घटनेच्यावेळी आई ही घरातच होती.स्वयंपाक करून आईने मुलीस जेवयास सांगितले होते.वैष्णवीने अभ्यास करायचे आहे ,असे सांगितले आणि दार लावून घेतले. वैष्णवीची आई ही बाहेर शेजाऱ्यांशी बोलत बसली होती. त्यावेळी वैष्णवी ही एका खोलीत अभ्यासासाठी बसली होती. त्याच वेळी ही वैष्णवीने अभ्यासाच्या खोलीत गळफास घेतला . ही घटना कळताच आई -वडिलांना काय करावे हे सुचेनासे झाले. त्यांनी आरडा ओरड करत रडण्यास सुरूवात केल्यानंतर शेजारील लोकांना धाव घेतली अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातच-
शालेय विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती कळताच एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक राजन माने, हेड कॉन्सटेबल डी. जी. नवले हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.आत्महत्या का केली?,त्याला अभ्यासचा तणाव होता का?घरात कोणी रागावले होते का?या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत.
0 Comments