संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने आयोजित ट्रान्सफॉरमिंग एज्युकेशन या आंतराष्ट्रीय परिषदेत जगभरातील शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून बार्शी येथील रहिवासी असणाऱ्या रणजीतसिंह डिसले गुरुजी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दिनांक १६ ते २० सप्टेंबर या कालावधीत न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात ही आंतराष्ट्रीय परिषद होत असून शिक्षणाच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवणाऱ्या युवा शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून हा सन्मान मिळाला आहे.
३ दिवस चालणाऱ्या या परिषदेत शिक्षणाचा प्रसार, शिक्षण व्यवस्थेतील समस्या व त्यावरील उपाय आणि जगभरातील नेत्यांची भूमिका या विषयावर विचार मंथन होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य देशाचे प्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील संस्था व त्यांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.
0 Comments