बार्शी शहरातील परंडा रोड येथे इंडिया ऑटो गॅरेज च्या समोर बेवारस पर्स आढळून आली होती, ती पर्स राजू रशीद मोमीन वय ४५ रा. ४२२ गाडेगाव रोड बार्शी यांनी शहर पोलीसकडे जमा केली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्रीमंत खराडे या घटनेचा अधिक तपास करत होते, बेवारस पर्सचा मालकाचा शोध घेतला असता सदरची पर्स हि परविन सलिम कुरेशी वय ३० वर्षे रा. मंगळवार पेठ बार्शी यांचे मालकीची असल्याबाबत निष्पन्न झाले असुन समक्ष खात्री करुन पर्स व सोन्या चांदीच्या दागिण्यांची खात्री केली असता मिळुन आलेली पर्स व दागिणे हे परविन सलिम कुरेशी यांचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ही पर्स राजु रशिद मोमिन वय ४५ वर्षे रा ४२२ गाडेगाव रोड बार्शी यांना समक्ष पोलीस ठाणेस बोलवुन घेवुन बेवारसपणे मिळुन आलेली पर्स व दागिणे हे १) परविन सलिम कुरेशी वय ३० वर्षे रा. मंगळवार पेठ २) सलिम जब्बार कुरेशी वय ३७ वर्षे रा मंगळवार पेठ यांच्या ताब्यात देण्यात आली, गॅरेज चालकाच्या या कृत्याचे बार्शी मध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments