मुंबई | मी सुरुवातीपासून भाजपसोबत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माझी बाजू घेतली… आपल्या मतदारसंघात कामे झाली नाहीत तर आमदार नाराज होतात. आता राज्यात भाजपची सत्ता येण्यास काहीच अडचण नाही असे मत भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले.
बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे सुरुवातीला भाजपमध्ये होते मात्र विधानसभा निवडणुकीत बार्शीची जागा ही शिवसेनेला सुटल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. आणि त्यात ते विजयी झाले. तेव्हापासून त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थक म्हणून ओळखले जातात.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत ही राऊत हे भाजपच्या सोबत होते. राज्यातील एकनाथ शिंदेच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या घडामोडीत ही ते भाजप सोबत आहेत. कालच ते भाजपने बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीसाठी बार्शीतून मुंबई ला रवाना झाले आहेत.
मुंबईत पोहचल्या नंतर ANI वृत्त संस्थेशी बोलताना आता राज्यात कोणत्याही परिस्थितीत भाजप सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.
0 Comments