टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरीज खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये आहे. त्याचवेळी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही इंग्लंडला पोहोचला आहे. त्याची भारतीय संघात निवड झालेली नाही. पण तो इंग्लंडमध्ये आहे. अर्जुन सध्या इंग्लंडमध्ये फिरतोय.
याच दरम्यान मास्टर ब्लास्टरच्या मुलाचा एक फोटो व्हायरल होतोय, ज्यात तो एक महिला खेळाडूसोबत फिरताना दिसतोय. अर्जुनचा एक फोटो चर्चेत आहे. त्यात, तो इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनिएल वॅट सोबत फिरताना दिसतोय. एका रेस्टॉरंटमधला हा फोटो आहे. जिथे डॅनियल आणि अर्जुन लंचसाठी गेले होते. डॅनियल वॅटने हा फोटो आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये टाकला होता. अर्जुन आणि डॅनियलचा हा लंडनच्या सोहो रेस्टॉरंटमधला फोटो आहे.
अर्जुन नेहमीच वॅटला भेटतो
य़ात अर्जुनच्या ताटात अनेक रुचकर पदार्थ दिसतायत. या फोटोत वॅट दिसत नाहीय. पण तिच्याच मोबाइल कॅमेऱ्यामधून हा फोटो काढण्यात आल्याची शक्यता आहे. अर्जुन आणि डॅनियल वॅट दोघेही चांगले मित्र आहेत. अर्जुन लंडनमध्ये असताना नेहमीच वॅटला भेटतो. याआधी सुद्धा दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
विराटला लग्नासाठी केलं होतं प्रपोज
विराट कोहली डॅनियलच्या आवडत्या क्रिकेटपटूपैकी एक आहे. तिने याआधी विराट कोहलीला लग्नासाठी सुद्धा प्रपोज केला होता. त्यावेळी ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. डॅनियल वॅट तेंडुलकर कुटुंबाला चांगली ओळखते. 2009-10 साली ती लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सचिन तेंडुलकरला पहिल्यांदा भेटली होती. डॅनियल वॅटची सचिनशी ओळख झाली. त्यावेळी अर्जुन तेंडुलकर अवघ्या 10 वर्षांचा होता. वॅट तेंडुलकर कुटुंबासोबत चांगले संबंध ठेऊन आहे.
अर्जुनला एकाही मॅचमध्ये संधी नाही
अर्जुन तेंडुलकर आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये होता. पण त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्सचा संघ या सीजनमध्ये तळाला राहिला. सततच्या पराभवांमुळे अर्जुन तेंडुलकरला एकातरी मॅचमध्ये संधी मिळेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण असं घडलं नाही.
0 Comments