‘तुला पुरुष महत्वाचे वाटतात का’? जेनेलियाच्या उत्तरानं रितेश हँग


रितेश देशमुख आणि जेनेलियाची जोडी बॉलीवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारं कपल म्हणून त्यांची चर्चा असते. कोरोनाच्या काळात त्यांनी तयार केलेले रिल्स हे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. वेगवेगळ्या प्रकारचे गंमतीशीर व्हिडिओ रितेश आणि जेनेलियानं शेयर केले आहे. आताही ते त्यांच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. त्यामध्ये जेनेलियाला तिच्या मैत्रिणीनं एक प्रश्न विचारला आहे. तो प्रश्नही भन्नाट आहे पण त्यापेक्षा जेनेलियानं तिला दिलेलं उत्तरही तेवढचं भारी आहे.

जेनेलियानं दिलेल्या उत्तरावर रितेशचे एक्सप्रेशन्स नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्या उत्तरानं तो काही वेळ स्तब्धच झाला आहे. असे त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. रितेश आणि जेनेलियाच्या रिल्सचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या काही सेकंदाच्या रिल्सला नेटकऱ्यांचा लाखोंच्या संख्येनं प्रतिसाद मिळतो.

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जेनेलियाच्या एका मैत्रिणीनं तिला विचारलं की, तुला पुरुष जास्त महत्वाचे वाटतात का? त्यावर जेनेलियानं उत्तर दिलं, पण कशासाठी….त्यावेळी जेनेलियाच्या पाठीमागे उभा असलेल्या रितेशला काय बोलावं हेच कळत नाही. काही वेळापूर्वी व्हायरल झालेल्या त्या व्हिड़िओला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या आहेत.

त्या व्हिडिओमध्ये जेनेलिया तिची मैत्रीण एकता पारेखसोबत दिसत आहे. त्या दोघींनी मिळून रितेश आणि राजीव पारेख यांची टर उडवली आहे. जेनेलियानं दिलेल्या उत्तरानं रितेश आणि राजीव हे दोघेही शॉक झाले आहेत. जेनेलिया आणि रितेश यांचा बराच काळापासून एकत्रित सिनेमा आला नसला तरी ते सोशल मीडियावर सक्रिय असणारे सेलिब्रेटी आहेत. जेनेलियाचा इंस्टावर असणारा फॉलोअर्सही मोठा आहे.

सध्या जेनेलियानं जो व्हिडिओ पोस्ट केला आहे त्याला एक गंमतीशीर कॅप्शनही दिली आहे. त्यामध्ये ती म्हणते की, एक गंभीर बाब, ती म्हणजे तुम्हाला वाटतं की, पुरुष जास्त महत्वाचे आहेत? वास्तविक मी रितेशवर खूप प्रेम करते. पण थोड्यावेळासाठी मस्ती करण्यास काय हरकत आहे? अशाप्रकारची गंमतीशीर कॅप्शन तिनं दिली आहे. नेटकऱ्यांनी तिला दाद दिली आहे.

Post a Comment

0 Comments