चिखर्डे :
कर संकलित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. बार्शी तालुक्यातील चिखर्डे ग्रामपंचायत अनोखा उपक्रम राबवत असून, शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांमधून लकी ड्रॉ काढून त्या व्यक्तीस १५ ऑगस्ट रोजी झेंडावंदनाचा मान मिळणार आहे. उल्लेखनीय बाब ही की, त्या करदात्यास ग्रामपंचायतीकडून पोशाख देऊन सन्मानित केले जाणार आहे.
१३ ऑगस्टपर्यंत जे कर भरतील त्यांच्यातून लकी ड्रॉ पद्धतीने एकाची निवड केली जाणार आहे. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लकी ड्रॉ काढला जाणार आहे. झेंडावंदन व भर पोशाखाचा मानकरी कोण ठरणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. अशी माहिती चिखर्डे गावाचे सरपंच प्रकाश शिवाजी पाटील यांनी दिली.
0 Comments