कुर्डूवाडी / प्रतिनिधी :
जुन्या काळातील सुप्रसिध्द पैलवान शफेरुद्दीन काझी आज दुपारी दुर्दम्य आजाराने काळाच्या पडद्याआड गेले. सुप्रसिध्द मल्ल कुस्ती सम्राट आस्लम काझी यांचे ते पिताश्री होते. सापटणे (भोसे) ता.माढा या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने माढा तालुक्यासह, महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या शफेरुद्दीन काझी यांनी मोठ्या कष्टातून मोठा मुलगा अास्लम यांना चांगला पैलवान तयार केला, तर छोटा मुलगा आशपाक यांना इंजिनियर बनवलं.आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी प्रसिद्ध मल्लां बरोबर लढती केल्या. सध्याच्या कुस्ती क्षेत्रात त्यांचा चांगला वावर होता.
राज्यातील वस्ताद मंडळी, पैलवान मंडळी, कुस्तीशौकीनांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. समाजजीवनात 'चाचा', 'भई' या नावांनी पुकार करत अनेक लोक त्यांना मान,सन्मान देत होते. प्रत्येकाशी आपुलकीने,मायेनं,नम्रतेने बोलणं हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्टय होतं. त्यांच्या अशा जाण्याने राजकारण,क्रिडा,समाजकारण या क्षेत्रातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.विविध राजकीय पुढारी तसेच नामवंत कुस्तीपटूंनी या प्रसंगी शफेरुद्दीन काझी यांना श्रद्धांजलि अर्पण केली आहे.
0 Comments