बार्शी/प्रतिनिधी:
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवार 17 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत अनेक महिन्यानंतर देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी ते पुण्याहून मोटारीने सांगोला याठिकाणी दुपारी दीडच्या दरम्यान येतील, माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी ते सांत्वनपर भेट देणार आहेत, त्यानंतर काही वेळ थांबून ते पुढे बार्शीकडे जाणार आहेत. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या राऊत चाळ याठिकाणच्या निवासस्थानी ते जातील, नंतर तिथून सोयीने ते पुण्याला जाणार आहेत.
आमदार राजेंद्र राऊत यांनी फडणवीस यांचे सरकार असताना मुख्यमंत्र्यांशी सलगी वाढवली, त्यांच्या अतिशय जवळ ते होते, विधानसभा निवडणुकीत बार्शीची जागा ही शिवसेनेला असल्याने राऊत अपक्ष उभे राहिले, फडणवीसांनी सहकार्य केले, राऊत अपक्ष आमदार झाले. सोलापूर जिल्ह्यात 13 पैकी भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामध्ये राजाभाऊ हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. काही दिवसांपूर्वी राऊत यांच्या मुलाचे लग्न झाले होते, ती शुभेच्छा भेट असू शकते.
0 Comments