वैराग/प्रतिनिधी;
बार्शी तालुक्यातील रातंजन येथे अवैध दारूविक्री सर्रास होत असल्याने सरपंच ग्रामसेवक/ ग्रामस्थ /ग्रामपंचायत रातंजन आक्रमक पवित्रा घेतला. ग्रामसभेत दारूविक्री बंदीचा ठराव मंजूर करून घेण्यात आला.
कोणत्याही परिस्थितीत गावातील दारू बंद करायची असा ठरावच त्यांनी ग्रामपंचायतीच्या १६ जुलै रोजी ग्रामसभेत मंजूर करून घेतला.
त्यानंतर सरपंच /ग्रामसेवक /ग्रामस्थ ग्रामपंचायत रातंजन १९ जुलै वैराग पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत निवेदन दिले.गावात तीन ठिकाणी दारूविक्री सर्रास केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनीही केला. गावात सहजपणे दारू उपलब्ध होत असल्याने मद्यपींचा उपद्रव वाढला असून दारूसाठी पैसे जमा करण्यासाठी लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रकार सुरू आहे.
यामुळे गावातील वातावरण पूर्णपणे दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनीही केला आहे.दारूबंदीसाठी पोलिसांनी गाव परिसरात गस्त वाढवावी व त्यांच्यावर वचक ठेवावा, यासाठी गावातील सरपंच/ ग्रामसेवक /ग्रामस्थांन ग्रामपंचायत रातंजन ग्रामसभेत हा विषय मंजूर करून घेतला. बेकायदेशीर दारूविक्री बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, दारूबंदी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, उत्पादन शुल्क अधिकारी यांना दिल्या आहेत.
0 Comments