✒️शरद कदम-पाटील
जगण्याचा अर्थ आई ! जगण्याची उमेद आई !!
जीवनाचं सार्थक आई ! जीवनाची प्रेरणा आई !!
सारा दिवस चालून थकून जातो
तेंव्हा शेवटपर्यंत आठवणीत, राहते ती फक्त आई !
तूच माझ्या जीवनाची किमयागार ! तुजवीण श्रेष्ठ नसे कोणता अलंकार !!
मी शिकावं शिकावं , नि खूप मोठ व्हाव !
मनी बाळगून हे स्वप्न ,
त्या काळ्या रानी राबणारी , तूच माझी आई !
काटा रुतला माझ्या पायात, अश्रू उभे तुझ्या डोळ्यात!
मजसाठी दररोज, त्या काट्यातन चालणारी ,
तूच माझी आई!
माझ्यासाठी ,दादासाठी आणखी बाबांसाठी !
जगता जगता, स्वतःसाठी तू किती जगली मोजलेच नाही!
आई म्हणते माझी ,तुम्ही करत रहा काम!
भीती वाटली कि, फक्त म्हणावे,राम,राम !
विसरु कसा तुला मी,तुझ्यामुळे बाळकृष्ण झालो!
तुझ्याच संस्कारी घडलो ,कौशल्यापुत्र मी !!
तुझ्याच संस्कारी घडलो, कौशल्यापुत्र मी !!
2 Comments
खूपच छान कविता👌👌... Excellent
ReplyDeleteमस्त 👍👌
ReplyDelete