नवी दिल्ली ;
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पुन्हा पत्र लिहून कोरोना संदर्भात व्यथा मांडली आहे. या पत्रात त्यांनी देशात कोरोना म्युटेशन (कोरोनाचे रूप) सतत ट्रॅक करायला पाहिजे. सर्व म्युटेशनवर लवकरात लवकर उपलब्ध असलेल्या लसींची चाचणी घ्यावी. देशातील सर्वांना जितक्या लवकर होईल तितक्या लवकर लस देण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर सरकारच्या अपयशामुळे देश पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे, असा आरोप देखील केला आहे. अशा परिस्थितीत गरीबांना तात्काळ आर्थिक मदत द्यायला हवी. गेल्या वर्षीप्रमाणे त्यांचे हाल होऊ नयेत असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
.
पुढे त्यांनी पत्रात, पुन्हा एकदा तुम्हाला पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर आली आहे, कारण आपला देश कोविड त्सुनामीच्या विळख्यात सापडला आहे. अशा प्रकारच्या अनपेक्षित संकटात भारतीय जनतेलाच आपलं सर्वात जास्त प्राधान्य असायला हवं. देशातील जनतेला या त्रासातून वाचवण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याची मी तुम्हाला विनंती करत आहे, असं म्हटलं आहे.
जगातील प्रत्येक सहा कोरोनाबाधित लोकांमागे एक भारतीय व्यक्ती आहे. या साथीमधून आता असं दिसत आहे की, आपल्या देशाचा आकार, विविधता यामुळे कोरोनाला अनुकूल असं वातावरण बघायला मिळालं आहे. कोरोनाने अनेक रुपं बदलली असून आता धोकादायक स्वरुपात समोर आला आहे. ज्या डबल म्यूटंट आणि ट्रिपल म्युटंटला आपण पाहतोय ती एक सुरुवात असू शकते, अशी भीती देखील त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.
0 Comments