बापरे! महाराष्ट्रात एका दिवसात ५७ हजार नवे कोरोना रुग्ण


 महाराष्ट्रात एका दिवसांत ५७ हजार ७४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तसेच दिवसभरात २२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 

 एका दिवसात राज्यातील २७ हजार ५०८ जण कोरोनामुक्त झाले. वाढत्या कोरोना संकटामुळे राज्यात वीकेंड लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध लागू झाले. दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू झाली.

 आतापर्यंत महाराष्ट्रात ३० लाख १० हजार ५९७ जण कोरोनाबाधीत झाले. यापैकी २५ लाख २२ हजार ८२३ जण कोरोनामुक्त झाले. 

 राज्यात कोरोनामुळे ५५ हजार ८७८ जणांचा मृत्यू झाला. तसेच कोरोना झालेल्या १ हजार ३९३ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रात सध्या ४ लाख ३० हजार ५०३ कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

Post a Comment

0 Comments