कोरोना संसर्ग होण्याच्या भीतीने नातेवाईक अस्थी घेत नसल्याने, पालिका कर्मचारी करतात अस्थी विसर्जन



पुणे : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कित्येक लोकांचे मृत्यू देखील कोरोनामुळे होत आहेत. असं असतानाच स्मशानभूमीमध्ये करोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांचे नातेवाईक पुन्हा अस्थी घेण्यासाठी येत नसल्याने या अस्थींच्या विसर्जनाचं कामही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना करावं लागत असल्याचे धक्कादायक वृत्त समजत आहे.

कोरोनामुळे शोषल डिस्टनसींगचे पालन करण्याचे आवाहन सरकार करत आहे. मात्र कोरोनामुळे लोकांच्या मनात देखील अंतर वाढू लागले आहे.लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत महापालिका कर्मचारी सांगतात, करोना सुरु झाल्यानंतर हळूहळू मृतांची संख्या वाढत गेली. तसा आमच्यावरील ताण देखील वाढत गेला. सुरुवातीला दहा बारा मृतदेह यायचे. आता इथे दररोज साधारण २५ ते ३० मृतदेह येत आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहून मन सुन्न झालं आहे.

सुरुवातीला नातेवाईक येत नव्हते. पण आता काही प्रमाणात अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईक येताना दिसत आहे,” असं जाधव सांगतात. नातेवाईक अंत्यसंस्काराला येत असले तरी ते अस्थी घ्यायला येत नाहीत असंही जाधव यांनी म्हटलं आहे. “आता मृतांच्या अस्थी घेण्यास नातेवाईक येत नाही. मी जर अस्थी घेतल्या तर मला देखील हा आजार होईल. या भीतीपोटी नागरिक येत नाहित.या कामामधून महापालिका कर्मचाऱ्याच्या माणुसकीचे दर्शन घडून येत आहे.

Post a Comment

0 Comments