अक्कलकोट/प्रतिनिधी:
किणी रोड येथील घाण विहिरी मध्ये सहा आरोपींनी मिळून मयत,नागप्पा वाडे वय,४० याचा खून करून त्याचे दोन तुकडे पोत्यात भरून, दगड,गोटे बांधून पाण्यात टाकले.
खूनी आरोपी मल्लिनाथ वाडे पती,पत्नी मजूरी साठी येथे आले. अत्यंत नियोजनपूर्वक त्यांनी खुनाची आखणी करून मृताचे लग्न करण्याचा बहाण्याने त्याला बोलावून कुराडी ने दोन तुकडे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
गांधारी नावाच्या महिलेची मुख्य भूमिका असून कर्नाटक पोलिसांनी चोवीस तासात चार आरोपीना अटक केली, दोन आरोपी फरार आहेत. तपास पोलीस अधिकारी मंजूनाथ व इंदुमती जाधव ह्या करीत आहेत.आरोपी व मृत सर्व रा. हिरोळी ता.आळंद चे रहिवाशी आहेत. हिरोळी गाव गुन्हेगारीमुळे नेहमी कुप्रसिद्ध आहे.
0 Comments