बार्शी /प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य डिजिटल संपादक-पत्रकार संघाच्या बार्शी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम मातृभूमी हॉल येथे पार पडला. राज्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य डिजिटल संपादक-पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते धिरज शेळके यांना बार्शी तालुका सहसचिव पदाचे निवडीचे पत्र देण्यात आले. त्यावेळी बोलताना, बार्शी ही माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे येथील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करताना मला अत्यानंद होत आहे. या संघटनेच्या माध्यमातून विधायक कार्याला गती देऊन सर्वसामान्यांचा आवाज बनण्याची जबाबदारी तुमच्यावर असल्याचेही राजा माने म्हणाले.
यावेळी बार्शी तालुका सहसचिव पदी निवड झालेले धिरज शेळके यांनीही संघटनेच्या कार्याला गती देत, सर्वांना सोबत घेऊन, आपण माझ्यावर दिलेली जबाबदारी कायमस्वरूपी विश्वासास पात्र राहून आणि आपल्या मार्गदर्शनातच काम करेल असे म्हटले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य डिजिटल संपादक - पत्रकार संघांचे बार्शी तालुका अध्यक्ष अजय पाटील, सहयोग फाउंडेशनचे गणेश शिंदे, रवींद्र गालफाडे आदी उपस्थित होते.
0 Comments