वेस्ट इंडीज विरुद्ध श्रीलंका यांच्यातील T-२०सामन्यात आक्रमक खेळाडू कायरन पोलार्ड ने ६ चेंडूत ६ षटकार लगावत माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी साधली. श्रीलंकन फिरकीपटू अकिला धनंजयच्या गोलंदाजीवर पोलार्डने हा कारनामा केला.
पोलार्डने ११ चेंडूमध्ये ३८ धावांची खेळी केली. यामध्ये सहा चेंडूत सहा षटकांरांचा समावेश होता. विशेष गोष्ट म्हणजे पोलार्डने हे सहाही षटकार मैदानाच्या वेगवेगळ्या दिशांना मारण्याऐवजी सरळ मारले. पोलार्डने युवराज सिंगच्या टी-२० मधील विक्रमाची बरोबर केली आहे. तब्बल १४ वर्षांनंतर कोणत्याही खेळाडूला या विक्रमाची बरोबर करण्यात यश मिळालं आहे.
दरम्यान २००७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ षटकार मारून विश्वविक्रम केला होता. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनी पोलार्डने या विक्रमाशी बरोबरी केली.
0 Comments