पंढरपुरात कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या पाच हॉटेल सील


पंढरपूर/प्रतिनिधी;

पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्ह्यात आठवडी लॉकडाउन जाहीर केले आहे. संचारबंदी कायद्याचे पालन न करणाऱ्या पंढरपूर शहर व तालुक्यातील ५ हॉटेल सील करत  कारवाई करण्यात आली आहे. विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या साडेपाच हजार जणांवर कारवाई..

पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये कोरोना नियमांचे पालन न केलेल्या साडेपाच हजार जणांवर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यातून सुमारे ५६ लाख रुपयांचा महसूल प्रशासनाला जमा झाला. मस्त चा वापर न करणाऱ्या ३६६९ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरामध्ये वावरत असताना सुरक्षा अंतर न ठेवणाऱ्या १६६९ नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई माहिती विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली..

पोलीस प्रशासनाकडून ५ हॉटेल सील...

कोरोना निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून पोलिस कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून पंढरपूर शहर व तालुक्यातील सहारा परमिट रूम दोस्ती ढाबा,  मेजर कॉर्नर व गावरान तडका या हॉटेलमध्ये अचानक भेट दिली. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून आले नाही.स्क्रीनिंग मशीन व सॅनिटायझर उपलब्ध नसल्याचे दिसून आले. हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी रात्रीच्या सुमारास दिसून आली. यामुळे या पथकाकडून पाच हॉटेल तात्काळ सील करण्यात आले व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाकडून कारवाईसाठी पथके तैनात..

कर्नाटक पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पोलीस कर्मचाऱ्यांचे पथके तयार करण्यात आली आहेत पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, बार्शी करमाळा, तालुक्यातील प्रशासनाकडून पथकांच्या सहाय्याने ग्रस्त करणत येत आहे. कोरोना नियमांचे काटेकोर पालन बाबत प्रशासनाकडून नागरिकांना सूचना करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments