भारतीय संघाने अखेरच्या कसोटी सामन्यामध्ये २५ धावांनी पाहुण्या इंग्लंडच्या संघाचा पराभव केला. यासोबतच संघाने कसोटी मालिका ३-१ अशा फरकानं खिशात टाकली. अखेरच्या कसोटी सामन्यात मिळालेल्या विजयामुळे भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
या कसोटी मालिकेत ऋषभ पंत, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीनं खेळपट्टी गाजवत क्रीडारसिकांच्या मनावर राज्य केलं. इंग्लंडच्या संघाला चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पराभवाचा पत्करावा लागला. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडनं पहिल्या डावात २०५ धावा केल्या.
भारतीय फलंदाजांनी याचं उत्तर देत ३६५ धावांसह इंग्लंडवर १६० धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावामध्ये इंग्लंडच्या संघातील सर्व खेळाडू अवघ्या १३५ धावांवर बाद झाले. या सामन्यात अक्षर पटेल यानं सर्वाधिक ९ गडी बाद केले. तर, अश्विननं ८ गडी बाद केले.
कसोटी मालिकेमध्ये इंग्लंडच्या संघाने २२७ धावा करत पहिला सामना जिंकला होता. परंतु, दुसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत करत भारतीय संघानं या मालिकेतील आव्हान कायम ठेवलं होतं.
तिसऱ्या कसोटी सामन्यात, भारतीय संघानं ऐतिहासिक विजयाची नोंद करत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक मानाचं पान जोडलं.
0 Comments