माळशिरस/प्रतिनिधी:
नियोजित एमपीएससी परीक्षा तीन दिवसांवर आली असतानाच ठाकरे सरकारकडून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षा नियोजित वेळेत व्हावी यासाठी पुण्यातील नवी पेठेत विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. या आंदोलनात गोपीचंद पडळकर सहभागी झाले असून, ते या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. आमदार पडळकरांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमदार पडळकर यांना अटक केल्यानंतर त्याचे पडसाद माळशिरस तालुक्यात खुडूस व विझोरी गावातील तरुणांनी टायर जाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला..
माळशिरस तालुक्यातील खुडूस व विझोरी गावामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे तरुणांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक झाल्यानंतर गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास टायर जाळून राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्य सरकारने लवकरात लवकर स्पर्धा परीक्षा घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली..
१४ मार्च रोजी होणारी स्पर्धा परीक्षा राज्य सरकारने कोकणाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली. पुणे येथे विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यांनी जे मुद्दे मांडले ते बरोबर आहे. महाविकास आघाडी सरकारने सहा वेळा स्पर्धा परीक्षा रद्द केले आहेत. १४ मार्च रोजी होणारी परीक्षा राज्य सरकारने कोरोना च्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्यात आली. अशाप्रकारे परीक्षा रद्द करणे चुकीचे असल्याची मत विद्यार्थ्यांनी यावेळेस व्यक्त केले. तरी राज्य सरकारने तात्काळ स्पर्धा परीक्षा द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली
0 Comments