....अखेर आघाडी सरकारला ‘सुबुद्धी’ सुचली - देवेंद्र फडणवीस


राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा कहर वाढत चालला आहे. राज्यात आघाडी सरकारने जमावबंदी केली आहे. आणि त्याच बरोबर कोरोना चाचण्याही वाढविल्या आहेत. राज्यात सरासरी दिवसाला १ लाख २३ हजार इतक्या चाचण्या केल्या जातात.

यावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टोला लगावत त्यांना सल्ला दिला आहे. चाचण्या वाढवा हाच कोरोनाला रोखण्यासाठी उत्तम पर्याय आहे. असे वारंवार सांगूनही आघाडी सरकार ऐकत नव्हते, मात्र अखेर त्यांना सुबुद्धी झाली आहे.

असा टोला लगावून त्यांनी राज्य सरकारला एक सल्लाही दिला आहे. येणाऱ्या काळात चाचण्या वाढवा, टाळेबंदी नसेल तर टेस्ट ट्रेस अँड ट्रीट हाच कोरोना रोखण्याचा मार्ग आहे. असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करत दिला आहे.

Post a Comment

0 Comments