सांगोला! सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची पेटवून घेऊन आत्महत्या, दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल


सांगोला/प्रतिनिधी:

सांगोल तालुक्यातील घेरडी येथील एका विवाहित महिलेने सासरच्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. अनिता हरिबा माने असे विवाहित मुलीचे नाव आहे. याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यामध्ये पती हरी बाबा शिवाजी माने व सासू कमलाबाई शिवाजी माने ( साध्य रा. सोनारी ता. उरण जि. रायगड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वडील शंकर आलदार यांनी फिर्याद दिली आहे.

जाचाला कंटाळून अनिताची आत्महत्या...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी अनिता हिचा विवाह गावातीलच हरिबा शिवाजी माने यांच्याबरोबर २०१८ मध्ये लावून दिला. मात्र हरिबा माने यांनी हे कुटुंबासह उपजीविकेसाठी रायगड जिल्ह्यातील सोनाली या गावात कामासाठी गेले होते मात्र अनीता हिला माहेरून सोने व पैशासाठी वारंवार जाच केला जात होता.या छळास कंटाळून बुधवारी (ता. २४ ) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अनिताने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले.

सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

अनितास उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता सरकारी दवाखान्यातील डॉक्‍टरांनी तिला तपासून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे घेऊन जाण्यास सांगितले असता, मात्र उपचारादरम्यान अनिताच्या मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी सांगितले. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नवरा व सासू यांच्याविरोधात सांगोला सांगोला पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments