पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, उद्योजक अभिजीत पाटील, प्रा.डाॅ.बी.पी.रोंगे यांनी उमेदवारी मिळावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडे केली अहे. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रभारी , माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
श्री.भेगडे म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षाकडे आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, प्रा.डाॅ.बी.पी.रोंगे यांनी उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे..
या संदर्भात विचारविनिमय करुन महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे उमेदवारांची नावे शिफारश करुन पाठवली जातील.
0 Comments