सांगोला/प्रतिनिधी :
पोलीस प्रशासनातील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत एका तोतया पोलीस निरीक्षकाने, आय.जी कंट्रोल येथून बोलत असून सांगोला पोलीस ठाण्यातील निलंबित अंमलदारांची माहिती द्या व डीओ यांना मला फोन करण्यास सांगा असे सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडे प्रश्नांची सरबत्ती केली असता त्या तोतया इसमाने उडवाउडवीची उत्तरे दिली. खोटे नाव सांगणाऱ्या या तोतया इसमाविरुद्ध सांगोला पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
अज्ञात तोतया इसमाने सोलापूर ग्रामीण नियंत्रण कक्ष येथील शिंदे यांना पोलीस निरीक्षक जाधव आयजी कंट्रोल येथून बोलत असून पोलीस निरीक्षक गवळी यांना या नंबरवर फोन करायला सांगा असा निरोप दिला.
पोनि राजेश गवळी यांनी त्या नंबरवर फोन केला असता सांगोला पोलीस ठाण्यात किती कर्मचारी सस्पेंड आहेत अशी विचारणा विचारून डिओ यांना फोन करायला सांगा असे खोटे सांगून पोलिसाकडून सस्पेंड कर्मचाऱ्यांची माहिती घेतली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना संशय आल्याने माहिती घेण्याकरता त्या नंबरवर परत फोन करून विचारले असता पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव आय.जी. कंट्रोल असल्याचे कबूल केले. नंतर रामचंद्र जाधव बोलतोय असे सांगितले. पोनि गवळी यांनी तुमची नेमणूक केव्हापासून आहे, तुमची बॅच कोणती आहे. वगैरे अधिक माहिती विचारली असता तोतया अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन कट केला. त्यामुळे सदर तोतया अधिकाऱ्याने पोलिस निरीक्षकाचे पद धारण करीत नाही,
हे माहीत असतानाही अधिकारी असल्याची बतावणी केल्याने पो. नि.रामचंद्र जाधव कंट्रोल रूम असे नाव सांगणाऱ्या तोतया इसमाविरुद्ध पो.ना. प्रमोद गवळी यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पो.नि. राजेश गवळी करीत आहेत.
0 Comments