बागल कुटुंबीयांनी मकाई कारखान्यासाठी दिला आदिनाथ कारखान्याचा बळी - दशरथ आण्णा कांबळे


करमाळा तालुक्यातील सभासदांच्या मालकीचा मानला जाणारा सर्वात मोठा कारखाना आदिनाथ सहकारी साखर कारखाना या कारखान्यावर बागल कुटुंबाची एक हाती सत्ता असल्याने स्वार्थी राजकारणासाठी आदिनाथ कारखान्यावर जप्तीचे नोटीस काढण्याचे षडयंत्र रचुन करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना व सभासदांना अंधारात ठेवून आदिनाथचा वापर‌ मकाई कारखान्यासाठी केला असे दशरथ आण्णा कांबळे म्हणाले.

पुढे बोलताना म्हणाले जप्तीची नोटीस काढण्याच्या मागची रणनीती बागल कुटुंबियांनी आखली होती. करमाळा तालुक्यातील जनतेचा, शेतकऱ्यांचा आणी सभासदांचा विश्वासघात करून कारखान्याचा वापर मकाई कारखाण्यासाठी केला.

करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखाना हा कायमस्वरूपी बंद पडावा या अनुषंगाने आदिनाथ कारखान्यावर जप्तीची नोटीस काढून त्याचा लिलाव करण्याचे कारस्थान बागल गटाने पध्दशीर पणे आखले होते हे मी बोलत नाही. कारखाना चालु करणार म्हणुन चेअरमन बोलत होते. मग जर कारखाना चालू करायचा होता तर आदिनाथच्या मशिनिरीचा वापर होत असल्याने करमाळा तालुक्यातील सभासद आदिनाथ कारखान्याचा गिअर बॉक्स मकाई कारखान्याला वापरण्यासाठी दिल्याचे सभासद बोलत आहेत.

थोड्या दिवसातच सिद्ध झाले कारखान्यातील सर्व मिशनरी गिअर बॉक्स मकाई कारखान्यासाठी वापरण्यात येत असल्याने जर आदिनाथ कारखान्यातील मशनिरीचा गैरवापर होत असेल तर या मागचे सूत्रधार कोण हे करमाळा तालुक्यातील जनतेने आणि सभासदांनी ओळखावे बागलाचे स्वार्थी राजकारण यामधून दिसून आले.

आत्तापर्यंत कामगारांच्या आणि ऊस उत्पादकांनच्या बाजूने प्रमाणिकपणे शेतकरी कामगार संघर्ष समिती लढत असताना अनेक आंदोलने मोर्चे उपोषणे केली आणि या कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून केलं याच जोरावर औद्योगिक न्यायालयाचा निकाल सुध्दा कामगारांच्या बाजूने लागला होता निकालात स्पष्ट सांगण्यात आले होते.

कामगारांच्या पगारी देण्यात याव्यात कारखाना 15 दिवसाच्या आत चालू करावा परंतु असे न होता बागल यांनी या कारखान्यातील सर्व मिशनरी मकाई कारखान्यासाठी वापरण्यास सुरुवात केली असे दशरथ अण्णा कांबळे म्हणाले पुढे बोलताना कांबळे यांनी सांगितले करमाळा तालुक्यातील काही गटाचे बगलबच्चे आम्हाला दबक्या आवाजात विरोध करत होते परंतु प्रिंट मिडिया मधून प्रशिध्दि करत नव्हते कारण आमची लढाई सत्याच्या बाजूने होती.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरळीत चालावा अशा आमचा हेतू होता परंतु काहीना वाटत होते कारखाना चालू होऊ नये म्हणून काही लोक आडवे येतात असे विरोधक बोलत होते परंतु आमची एकच भूमिका होती कोणत्याही मार्गाने कारखाना चालू व्हावा शरद चंद्रजी पवार साहेब यांना कारखाना चालू करण्यासाठी आमचा कधीच विरोध नव्हता तरीही काही विघ्नसंतोषी लोकांनी अफवा पसरवल्या होत्या आमचा एकच उद्देश होता.

पवार साहेबांनी प्रशासक नेमून प्रशासनाच्या ताब्यात देऊन कारखाना चालू करावा आणि पुन्हा आदिनाथ सहकारी साखर कारखानाला गतवैभव प्राप्त करावे अशी आमची भूमिका होती तर तालुक्यातील काहींनी यावर तर्कवितर्क काढून आदिनाथ कारखान्याचं वाटोळे करण्याचा डाव रचला होता आता हे सिद्ध झाले की आदिनाथचा गिअरबॉक्स हा साखर कारखान्याला कर्जाच्या स्वरूपात दिला आहे ही निंदनीय बाब आहे.

एवढा मोठा मानला जाणारा सहकारी साखर कारखाना सभासदांच्या घामाच्या पैसावर उभा केलेला कारखाना या सर्वोचा विश्वासघात करून कारखान्याचे तीन तेरा वाजविले असे शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Post a Comment

0 Comments